मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी वादग्रस्त ठरलेले भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असतांना अनंत अंबानी यांच्याकडून १५ कोटी रुपयांची देणगी संस्थेसाठी घेतल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी निनावी पत्राचा हवाला देत केला आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यपाल रमेश बैस यांना पाठवले असून चौकशीची मागणी केली आहे.
कोश्यारी यांनी पदाचा उपयोग करुन उत्तराखंडमधील एका शाळेच्या नावाने पैसे गोळा केले आहे. १०० सुध्दा मुले या शाळेत नाही. अशा शाळेच्या नावावर कोट्यवधी रुपयांच्या देणग्या गोळा केल्या आहे. या पैशातून कोश्यारी यांनी आपल्या पुतण्या दीपेन्दरसिंग कोश्यारी याच्यासाठी शाळेच्या आसपास भरपूर जमीन खरेदी करुन तिथे रिसॅार्ट सुरु केले आहे. अनंत अंबानी यांच्याकडून १५ कोटी घेतले आहे. एका निनावी पत्राने हे सर्व उघड झाल्याचे अनिल गलगली यांनी सांगितले…बघा गलगली यांचा व्हिडिओ









