येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मुख्य बाजार पेठेत स्वामी गिरी या तरुणाने हातात फलक घेत आपली व्यथा मांडली आहे. मुलांचे घटते जन्मदर तर दुसरीकडे विवाह इच्छूक तरुणांची वाढलेली संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच शेतकरी पुत्राला तर मुलगी कोणी लवकर देत नसल्याने अनेक तरुणांचे वय पुढे गेल्याचे ग्रामस्थांच्या तक्रारी आहे. अशा परिस्थितीत मुलगी कोणी देत नसल्याने हताश झालेल्या स्वामी गिरी या तरुणाने आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी हातात फलक घेत आपली व्यथा त्यातून मांडली आहे. त्यामुळे त्यांचा हा फलक सध्या चर्चेचा विषय ठरला असला तरी तो लक्षवेधी व समाजाचे वास्तव मांडणारा आहे.
स्वत:चा मुलगा १२ हजार रुपये पगाराने दुस-याच्या हाताखाली कामाला जातो. मात्र जावई ६० हजार रुपये पगाराचा वा रे दुनिया..अशा आशयाचा फलक घेऊन स्वामी आणि त्याच्या मित्रांनी भर बाजारात फिरुन विवाह इच्छुक तरुणांची व्यथा मांडली.
भर बाजारात तरुणाने हातात फलक घेत आपली व्यथा मांडल्याने त्याची एकच चर्चा बाजारात खरेदी साठी आलेल्या नागरीकां मध्ये होत होती.