नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी यंदाचे वर्षाचे अर्थिक अंदाजपत्रक सादर केले आणि यामध्ये एमएसएमईच्या माल पुरवठा केल्यानंतर यांचे पेमेंट ४५ दिवसात करण्याबाबत व त्याबाबतीत असलेल्या तरतुदी या नविनच सेक्शन ४३ बी (एच ) यामध्ये नमूद केल्या आहेत.
सदर विषयाबाबत लघु मध्यम उद्योजकांमध्ये अनेक संदिग्ध प्रतिक्रीया व विचारणा उद्योग वर्तुळातुन येत होत्या आणि त्यामुळे अनेक उद्योजकांमध्ये याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्मळ झाले होते. या सेक्शन ४३ बी (एच) याबाबत अभ्यासपूर्ण व सखोल माहिती व्हावी व उद्योजकांमधील संभ्रम दूर व्हावा या उद्देशाने निमाने या चर्चासत्राचे आयोजन निमा हाऊस सातपुर येथे केले होते.
चार्टर्ड अकाउंटंट मधुर जाजू व श्रीमती सना खान यांनी सखोल मार्गदर्शन केले. तांत्रिक बाबी समजून सांगत असताना सना खान व मधुर यांनी अत्यंत प्रभावीपणे विश्लेषण केले व या कायद्यातील तरतुदींचे सूक्ष्म निरीक्षण केले असता कशा पद्धतीने त्याची पूर्तता करावी याबाबतही त्यांनी सखोल मार्गदर्शन उपस्थित सर्व उद्योजकांना केले. अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण कार्यक्रम झाल्याचे अनेक उद्योजकांनी बोलून दाखवले.
उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या मनात असलेल्या शंका कुशंकांचे निरसनन करण्याकरता विविध प्रश्न विचारले आणि त्यांना सीए जाजू आणि सीए सना खान यांनी उत्तरे दिली. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष नंजय बेळे ,सचिव निखिल पांचाळ, व निमा टॅक्सेशन कमिटीचे चेअरमन मणेरीकर उपस्थित होते. प्रथम निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना केंद्र सरकारच्या मनात सूक्ष्म व लघु उद्योजकांना सक्षम करण्याकरिता हे पाऊल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी उचलले असल्याचे मत मांडले, आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करत असताना सूक्ष्म व लघुउद्योग सक्षम झाले पाहिजे त्यांना आर्थिक पाठबळ योग्य प्रमाणात मिळाले पाहिजे व त्यांचा येणाऱ्या पैशाचा प्रवाह जर सुरळीत झाला तर अत्यंत सक्षमतेने सूक्ष्म व लघुउद्योग उभे राहू शकतात असे प्रतिपादन केले, a या कायद्याची अंमलबजावणी ठोसपणे मोठ्या व आंतरराष्ट्रीय उद्योगांनी सुद्धा करणे गरजेचे आहे असे प्रकर्षाने नमूद केले, तसेच निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या हस्ते सीए मधुर जाजु व सना खान यांचा सत्कार करण्यात आला.
या चर्चासत्रामध्ये निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, संजय सोनवणे, मनिष रावल, विजय जोशी, सीएस सिंग, राजेंद्र कोठावदे यांसह मोठ्या संख्येने उद्योजकांनी प्रश्न मांडले. या चर्चासत्रासाठी आयमाचे अध्यक्ष ललीत बुब, भाजपाचे जेष्ठ नेते, लक्ष्मण सावजी, खजिनदार राजेंद्र वडनेरे, कैलास पाटील, जयंत जोगळेकर, सचिन कंकरेज, किरन जैन, नितिन आव्हाड, उमेश कोठावदे यांसह विविध कंपन्यांचे मालक व प्रतिनिधी असे सुमारे ३०० हुन अधिक उद्योजक व प्रतिनिधी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी यांसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी केले व आभार सचिव निखिल पांचाल यांनी मानले.