इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडः बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्या निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अप्पर सहनिबंधक पदाचा त्यांनी राजीनामा दिला असून आता त्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.
नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्या बीडमध्ये दाखल झाल्या. विनायक मेटे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे त्यांनी जाहीर केले.
महाविकास आघाडीतर्फे मेटे यांनी पवार यांची दोन वेळा भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल असे बोलले जात आहे. पण, शरद पवार यांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला नाही. महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यास त्या अपक्ष लढणार आहे.