नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. संविधान चौकातून निघालेली ही रॅली मार्गस्थ होत असताना ‘व्हरायटी चौक’ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्मारकास त्यांनी अभिवादन केले.
यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अनिल देशमुख, सुनील केदार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थितीत होते. नागपूर लोकसभा मतदार संघात भाजपतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उमेदवार आहे. त्यामुळे काँग्रेसने या ठिकाणी शक्तीप्रदर्शन करत हा अर्ज दाखल केला.
नागपूरमध्ये काँग्रेसचे सर्वच नेते यावेळी उपस्थितीत होते. येथील निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असून ती जिंकावी असा निर्धार केला आहे. पण, प्रतिस्पर्धी उमेदवार नितीन गडकरी यांची लोकप्रियता व त्यांनी केलेली विकास कामे यामुळे ही निवडणूक काँग्रेससाठी सोपी नाही. त्यामुळे येथील निवडणूक रंगतदार होणार आहे. नितीन गडकरी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह प्रमुख नेते उपस्थितीत राहणार आहे.