नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोदाघाट भागातील रामकुंड परिसरात असलेले दुकान चोरट्यांनी फोडले. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला असून त्यात पुजेसाठी लागणारे तांब्या पितळाचे लोटे,तांबे, गंगाजली, देवाच्या मुर्त्या,पूजेचे साहित्य तसेच रोकडचा त्यात समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत ज्ञानेश्वर निकम (रा.कर्णनगर,पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निकम यांचे रामकुंड परिसरातील अहिल्याराम मंदिरासमोर जय जनार्दन जनरल स्टोअर्स नावाचे दुकान असून, रविवारी (दि.२४) रात्री ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे छताचा पत्रा उचकून तांब्या पितळाच्या वस्तू व रोकड असा सुमारे ५९ हजार ७२० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.