इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईःधुळवडीला माहीम येथील समुद्रकिनारी फिरायला आलेली पाच मुले बुडाली असून त्यातील एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. यश कागडा असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.चौघांना वाचवण्यात यश आले आहे.
कॉलेजात शिकणारे ही मुले समुद्रकिनारी फिरायला आली होती. शोध घेतलेल्या एका मुलाला जवळच हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी माहीम पोलिस, अग्निशामक दलाचे पथक, सागरी पोलिस आणि स्वयंसेवक समुद्रात बुडालेल्यांचा शोध घेत आहेत. समुद्रात बुडालेल्या पाचपैकी चौघांना वाचविण्यात यश आले. त्यातील दोघांवर उपचार करून घरी सोडण्यात आले, तर दोघांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हर्ष किंजले याचा मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांपैकी पाचवा विद्यार्थी यश कागडा याचा शोध सुरू आहे.