सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा ते धुळे जिल्ह्याच्या हद्दी पर्यंत असलेल्या नांदीन ते पिसोळबारी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाल्याने नागरीकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याच्या कामासाठी माती मिश्रीतखडी व हलक्या दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याने रस्ता हाताने उखडला जात आहे.नयाकामाकडे संबंधित अधिकारी लक्ष देऊन निकृष्ठ दर्जाचे काम थांबवून उच्च दर्जाचे काम करावे अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.