लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -.रविवार होळीच्या शुभमुहूर्तावर गणेश नगर येथील गणेश मंदिरात या हनुमान चालीसा पठाणचा शुभारंभ झाला. यावेळी हजारो महिला पुरुषांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट सचिव सौ. सुवर्णाताई जगताप, ॲड शेखर देसाई, नवनाथ श्रीवास्तव, अभिजीत लचके ,मनोहर खीलवणी, कैलास जैन, पुजारी विवेक जोशी यांचे हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली.
गेल्या वर्षी शहरात होळी ते हनुमान जन्मोत्सव हनुमान चालीसा पठण कार्यक्रम विविध मंदिरांमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी देखील या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच आयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर सुमारे ११ हजार भाविकांनी १ लाख हनुमान चालीसा पठण यशस्वी संपन्न केले होते.
रविवार (दि.२४) होळीच्या शुभमुहूर्तावर गणेश नगर येथील गणेश मंदिरात या हनुमान चालीसा पठाणचा शुभारंभ होणार झाला. सोमवार ( दि २५) रोजी सर्वे नंबर ९३ ग्रामपंचायत पटांगण, मंगळवार ( दि २६) रोजी लक्ष्मीनारायण मंदिर गोपाळकृष्ण मंदिर परिसर,शनिवार ( दि ३०) रोजी श्री हनुमान मंदिर होळकरवाडी, मंगळवार (दि.२) एप्रिल रोजी दुर्गा माता मंदिर गणेश नगर , शुक्रवार (दि.५) रोजी ज्ञानेश्वर महाराज मंदिर,शनिवार (दि.६) रोजी क्रांती चौक श्रीराम नगर , तर गुढीपाडव्याचे औचित्य साधून मंगळवार (दि.९) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हनुमान चालीसा पठण कार्यक्रम होणार आहे.
शनिवार (दि.१३) रोजी हनुमान मंदिर ब्राह्मणगाव विंचूर, ,सोमवार (दि.१५) रोजी हनुमान मंदिर कोटमगाव,मंगळवार (दि.१६) रोजी इच्छापूर्ती गणेश मंदिर, श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बुधवार (दि.१७) रोजी दुपारी ४ वाजता श्री बाबा अमरनाथ मंदिर एसटी डेपो लासलगाव, गुरुवार (दि.१८) रोजी श्री काशी विश्वेश्वर मंदिर पिंपळगाव नजिक, शुक्रवार (दि.१९) रोजी यशवंत व सुमन नगर, शनिवार (दि.२०) रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विद्यानगर,रविवार (दि.२१) रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर टाकळी विंचूर, सोमवार (दि.२२) रोजी श्री हनुमान मंदिर रेल्वे स्टेशन, व हनुमान जन्मोत्सव मंगळवार (दि २३) रोजी श्रीराम मंदिर लासलगाव येथे होणार आहे. सर्व कार्यक्रम हे रात्री ९ ते १० या वेळेत संपन्न होतील. लासलगाव व परिसरातील भाविकांनी या हनुमान चालीसा पठण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.