इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभेचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे रविवारी गाड्यांचा ताफा घेऊन ठाण्यात गेले. या ठिकाणी त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. धनुष्यबाण रामाचा…हेमंत गोडसे कामाचा, कोण आला रे कोण आला…शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागणी करण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते ठाण्यात दाखल झाले होते.
यावेळी खा. गोडसे यांच्याबरोबर पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्याबरोबर होते. यावेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिकच्या जागेचा आग्रह कायम, अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले. नाशिक आपला बालेकिल्ला असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
नाशिक लोकसभा मतदार संघाची जागा भाजपला मिळावी यासाठी जोरदार आग्रह होत असतांना खा. गोडसे यांनी हे शक्तीप्रदर्शन केले. ही जागा मनसेला सोडणार असल्याची चर्चा होत असल्यामुळे खा. गोडसे यांचे समर्थक गोंधळात होते. त्यामुळे त्यांनी आज शक्तीप्रदर्शन केले.