नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने १११ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यात हिमाचल प्रदेशमध्ये मंडी लोकसभा मतदार संघातून अभिनेत्री कंगना रनौत, रामयाण मालिकेचे अभिनेते अरुण गोविल यांना मेरठ, मेनका गांधी, यासह अनेक दिग्गजांना उमेदवारी दिली आहे.
यात महाराष्ट्रीतल ३ उमेदवारांचे नाव आहे. त्यात सोलापुरात राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलं आहे. या जागेवर सध्या भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी खासदार आहेत. भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक नेते यांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे.
राज्यात भाजपकडून याआधी २० उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आज तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप महाराष्ट्रात ४८ पैकी २३ जागांवर लढणार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.