इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीची बैठक वर्षा निवासस्थानावर संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस व अजित पवार हे उपस्थिती होते. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली. त्यांनी माजी मंत्री महादेव जानकर हे महायुतीच्या बैठकीला उपस्थितीत होते.
या बैठकीत जानकर हे महायुतीतर्फे निवडणूक लढवणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. ४८ जागांपैकी १ जागा रासपच्या जानकर यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. पण, आज अचानक जानकर हे महायुतीच्या बैठकीत गेले. त्यानंतर हा निर्णय झाला. यावेळी तटकरे यांनी येत्या दोन दिवसात सर्व उमेदवारी घोषित करण्यात येईल असे सांगितले.
परभणीतून लढणार असल्याची चर्चा
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवेल हे स्पष्ट सांगितले नाही. पण, परभणीतून ते निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.