इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आमदार बच्चू कडू अमरावती लोकसभा मतदारसंघातून वेगळा उमेदवार देणार असून त्यांनी नावाबाबत सस्पेंन्स ठेवले आहे. येत्या ६ एप्रिलला प्रहार पक्षाचा उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करेल असेही त्यांनी आज पत्रकारांशी बोलतांना सांगितले. .
यावेळी त्यांनी आमचा उमेदवार एक ते दीड लाखाच्या फरकाने जिंकून येईल. आमचा कार्यकर्ता जाहीर केला तर त्याच्यावर वेगळ्या पक्षांकडून दबाव येऊ शकतो. त्यामुळे उमेदवार जाहीर करत नाही. पण ६ तारखेला आम्ही उमेदलारी अर्ज दाखल करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
बच्चू कडू यांचा प्रहार हा महायुतीमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी वेगळा उमेदवार दिला तर त्यातून महायुतीला मोठा धक्का बसणार आहे. या ठिकाणी विद्यमान खासदार नवनीण राणा यांना कडू यांचा प्रचंड विरोध आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात ही रणनिती असल्याचे बोलले जात आहे.