बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या बैठकीत जाहीर केली ही वेगळी भूमिका…

by India Darpan
मार्च 24, 2024 | 2:07 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
manoj jarange

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवली सराटीत झालेल्या समाजाच्या बैठकीत आज आपली भूमिका जाहीर केली. यावेळी ते म्हणाले, मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले तर आपणच अडचणीत येऊ शकतो. माझ्यावर विश्वास ठेवा, मला राजकारणात ओढू नका. आपला प्रश्न लोकसभेचा नाही तर विधानसभेचा आहे. लोकसभा निवडणुकीत मोठया प्रमाणात फॉर्म भरणे किचकट प्रक्रिया आहे. यामुळे एकच उमेदवार द्या. तसेच तुम्हाला गावात बैठक घ्यायची असेल तर त्याची नोंद ठेवा आणि हे ३० मार्चच्या आता निर्णय घ्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, मराठा समाजाचे १७ ते १८ मतदारसंघावर वर्चस्व आहे. मराठ्यांनी निर्णय घेतला तर मुस्लीम आणि दलित आपल्या सोबत आहेत. यामुळे आपण लोकसभेत एकच उमेदवार द्या आणि अपक्ष द्या. दुसरा पर्याय म्हणजे आपण अर्ज न भरता मराठा समाजाने कोणत्याही पक्षाचा असेल त्याच्याकडून बॉण्ड लिहून घ्यायचा तू सग्या सोयऱ्यासाठी आणि मराठा आरक्षणासाठी आवाज उचलणार का..?

यावेळी ते म्हणाले की, लोकसभेचा विषय समुद्रासारखा आहे. आपला विषय लोकसभेतील नाही तर विधानसभेतील आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत हा विषय केंद्राचा नाही तर राज्य सरकारचा आहे. मराठा आणि कुणबी असल्याचा आधार मिळाला आहे, आता सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, ही मागणी आहे. आचारसंहिता संपल्यावर जर सरकारने आदेश काढला नाही तर त्यावेळी बघू.

मराठ्यांनी कोणत्याही प्रचार सभेला जायचे नाही. त्यासाठी तुम्हाला येथून गावात जावे लागणार आणि गावात जाऊन बैठक घ्यावी लागणार आहे. मराठ्यांची शक्ती राज्याला आणि देशाला दाखवायची आहे. उमेदवार देताना कोणत्या जातीचा उमेदवार द्यायचा हे ठरवायचे आहे. मराठ्यांनी अपक्ष लढवायचा निर्णय घेतला तर चार जाती एकत्र आले पाहिजे. राज्यकर्त्यांना यांना हिसका दाखवायचा असेल तर लोकसभा नाही तर विधानसभा महत्त्वाची आहे. आपली मते विखुरली जाऊ नये.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा गजाआड…तीन जीवंत काडतुसे हस्तगत

Next Post

येवला तालुक्यात बिबट्याने वनकर्मचा-यावर झडप घालून केले पलायन (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Screenshot 20240324 141101 WhatsApp

येवला तालुक्यात बिबट्याने वनकर्मचा-यावर झडप घालून केले पलायन (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011