इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली येथे भाजपा मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शनिवारी भाजप मुख्यालयात संपन्न झाली. या बैठकीत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह भाजपचे नेत उपस्थिती होते. या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्याचे बोलले जात आहे.
दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर महायुतीमधील जागा वाटप आता आज किंवा उद्या जाहीर होणार आहे. दरम्यान काही ठिकाणी उमेदवारी बोलले जात आहे.