नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मिरची हॉटेल परिसरात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३५ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेंद्र कुमार सुरेशचंद्र शर्मा (रा.यमुना अपा.मिरची हॉटेल मागे,पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शर्मा कुटूंबिय बुधवारी (दि.२०) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ३५ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास हवालदार राजुळे करीत आहेत.
बसमध्ये चढतांना प्रवासी महिलेची पर्स चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसमध्ये चढतांना प्रवासी महिलेची पर्स उघडून भामट्यांनी अलंकार चोरून नेल्याचा प्रकार महामार्ग बसस्थानक परिसरात घडला. या घटनेत ४८ हजार रूपये किमतीचे दागिणे चोरट्यांनी हातोहात लांबविले असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिता रविंद्र सिनलकर (रा.भिवंडी जि.ठाणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सिनलकर या नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आल्या होत्या. मंगळवारी (दि.१९) दुपारी परतीच्या प्रवासासाठी महामार्ग बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. मुंबई बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्स मधील अलंकार हातोहात लांबविले. अधिक तपास पोलीस नाईक गोडे करीत आहेत.