नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परिमंडळ २ कार्यक्षेत्रात गोमांस विक्री व वाहतूक करणा-या आठ जणांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी जारी केले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय तुकाराम पाळदे, संतोष मुरलीधर गिते (रा.दोघे शिंगवे बहुला,दे.कॅम्प), विकार इकबाल चौधरी,शहबाज इकबाल चौधरी (रा.दोघे पिंजरपाडा जुने नाशिक),फरान सुलतान शेख (रा.गुलशन हॉटेल जवळ,द्वारका) अल्ताफ आयुब शेख (रा. वझरे कॉम्प्लेक्स चौकमंडई),सद्दाम अन्वर पाटकरी (रा.दुधबाजार भद्रकाली),कयुम रशिद शेख उर्फ बबलू कुरेशी (रा.कुरेशीवाडा,वडाळानाका) अशी तडिपारीची कारवाई करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
त्यातील पाच संशयितांना एक वर्ष तर उर्वरितांना दोन वर्षासाठी शहर व जिह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पाच संशयित देवळाली कॅम्प आयुब खान अंबड तर सद्दाम पाटकरी व बबलू कुरेशी हे दोघे भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गोमास वाहतूक व विक्री करतांना मिळून आले होते. सदर परिसरातील कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता कायम राखण्याच्या उद्देशाने नाशिकरोड विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन बारी व अंबड विभागाचे सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या शिफारशीनुसार परिमंडळ २ च्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी ही कारवाई केली असून आगामी सण उत्सवांबरोबरच लोकसभा निवडणुक निर्विघ्न पार पाडण्यासाठी उपद्रवींना जिह्याबाहेर घालवले जात आहे.