इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी काँग्रेसने अगोदर ७ व आता ४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यात नागपूर – विकास ठाकरे, गोंदीया, भंडारा – प्रशांत पडोळे, रामटेक – रश्मी बर्वे, गडचिरोली – नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे.
गोंदिया – भंडारा या मतदार संघातून नाना पटोले यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात होते. पण, त्यांनी मला राज्यात प्रचारासाठी फिरायचे असल्यामुळे एका मतदार संघात अडकून पडायचे नाही असे सांगीतले होते. त्यामुळे त्यांच्या जागेवर या ठिकाणी प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दे्ण्यात आली आहे. चंद्रपूर येथील जागेचा तिढा अद्याप कायम आहे. येथे कोणाला उमेदवारी दिली जाते हे औत्सुक्याचे आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना २२, काँग्रेस १६ व राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागा असे सूत्र निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यात काँग्रेसने आता १६ पैकी ११ उमेदवार आतापर्यंत जाहीर केले आहे. आता ५ उमेदवारांची नावे बाकी आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने आपल्या २० उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. त्यातील १ जागा राजू शेट्टी यांना सोडण्यात येणार आहे. त्यामुळे एक उमेदवार ठाकरे गटाचा ठरणे बाकी आहे. तर पवार गटानेही आपले संभाव्य उमेदवारी निश्चित केले आहे.