नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बांधकाम व्यवसायासाठी लागणा-या पोकलॅण्ड मशिन व्यवहारात तब्बल सव्वा तेरा लाख रूपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बॅक खात्यात ऑनलाईन पैसे वर्ग करूनही हा व्यवहार पूर्ण करण्यात आला नाही त्यामुळे मशिन खरेदी करणा-याने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमंत बेहरा,तस्लीम शेख,आशिष साहू व व्यवस्थापक अशी फसवणुक करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी भाऊसाहेब मधुकर सोनवणे (रा.टकलेनगर,पंचवटी) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. सोनवणे यांनी व्यावसायीक कामासाठी पोकलॅण्ड मशिन खरेदी करायचे होते. गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी संबधीताशी संपर्क साधला होता. यावेळी संशयितांनी सांगितल्याप्रमाणे सोनवणे यांनी त्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसच्या माध्यमातून १६ लाख ३४ हजार रूपयांची रोकड भरणा केली होती.
मात्र संशयितांनी रक्कम स्विकारूनही पोकलॅण्ड मशिनचा व्यवहार पूर्ण केला नाही. तसेच पैसेही परत केले नाही त्यामुळे सोनवणे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.