इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बुलढाणा जिल्ह्यातील जवळा बुद्रुक येथे मुख्याध्यापिकेने एका आठ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केले. खराब केळी दिल्याचा जाब विचारणाऱ्या पालकांचा राग मनात धरून हे संतापजनक कृत्य मुख्याधिकापिकेने केले आहे. या प्रकरणी मुख्याध्यापिकेविरोधात ‘पोस्को’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे हादरलेल्या विद्यार्थ्याने ही घटना पालकांना सांगितली. पालकांनी शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
नेमकं घडलं काय
जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले. पीडित आठ वर्षीय मुलाला खराब केळ दिले. ही बाब त्याने पालकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी त्याबाबत मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली. त्याचा मुख्याध्यापिकेला राग आला. माझी तक्रार करतो का? माझी बदली करायला लावतो का? असे विचारत त्यांनी पीडित विद्यार्थ्याची पँट काढली. त्याच्यासोबत अश्लील चाळे केले.