नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – किशोर सुर्यवंशी मार्ग भागात उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार प्रदिप बागुल (रा.रवी अपा. सुवर्ण हॉस्पिटल जवळ ओंकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बागुल कुटुंबिय आपआपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून कपाटातील सुमारे २ लाख ४४ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले.
ही घटना रविवारी (दि.१७) दुपारी उघडकीस आली. अधिक तपास हवालदार राजू जगताप करीत आहेत.