इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर आपने जोरदार त्याला विरोध सुरु केला आहे. त्यात केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी मुख्यमंत्री @ArvindKejriwal जी ने देशवासियों के लिए Jail से भेजा संदेश असे सांगत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवला आहे.
या संदेशात केजरीवाल यांनी म्हटले आहे की. मला अटक करण्यात आली आहे. मी लोखंडाचा बनलेला आहे. माझ्या शरीराचा प्रत्येक कण देशासाठी आहे. माझे जीवन संघर्षासाठी आहे. देशाच्या आतील आणि बाहेरील काही शक्तींना भारताला कमकुवत करायचे आहे. अशा काही शक्ती आहेत ज्या देशभक्त आहेत, आपण देशभक्त शक्तींमध्ये सामील होऊन देशाला पुन्हा महान बनवायचे आहे.
दिल्लीतील माझ्या आई-वडील आणि बहिणींना वाटत असेल की आता त्यांचा मुलगा किंवा भाऊ तुरुंगात गेल्यावर त्यांना १००० रुपये मिळणार की नाही? मला त्यांना सांगायचे आहे की तुमच्या मुलाने किंवा भावाने काही वचन दिले आहे आणि जे केले नाही. मी दिल्लीचे एकही काम बंद पडू देणार नाही. मी सर्व आप कार्यकर्त्यांनाही सांगू इच्छितो की, देशाच्या सेवेत मग्न राहा, भाजप लोकांचा द्वेष करू नका, ते आमचे भाऊ-बहिण आहेत. – तुमचा मुलगा अरविंद केजरीवाल