नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा तालुक्यात बिबट्यांची मोठी संख्या असून बिबट्यांचा सतत वावर सुरु असतो. दुष्काळी परिस्थितीमुळे अन्न पाण्याच्या शोधात बिबटे सर्वत्र संचार करीत असतात. सटाण्याच्या ईजमाने येथील शेतकरी किरण धोंडगे यांची पोल्ट्री फार्म असून मृत कोंबड्यांना पुरण्यासाठी त्यांनी १५ ते २० फुट खोल खड्डा खोदलेला आहे. याच खड्ड्यात बिबट्या पडल्याची घटना घडली.
बिबट्या पडल्याचे कळताच शेतकरी किरण धोंडगे यांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. मात्र खड्ड्यात बिबट्या पडल्याची माहिती सर्वत्र पसरताच परिसरातील नागरीकांनी बिबट्याला पाहण्यासाठी धाव घेतली. दरम्यान वनविभागाचे पथक दाखल झाले त्यानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात आले आहे.