नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्सेशन सर्टिफिकेट शिवाय दस्त नोंदणी करुन खरेदी करावयाचे असेल तर सब रजिस्टर ऑफिसर यांना पाच हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून ते पंचासमक्ष हे पैसे घेतांना नाशिकरोड येथील वकील संदीप दिलीप कारवाळ (३८) हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या विरुध्द उपनगर, पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे मयत पती यांनी तक्रारदार ह्या सध्या राहत असलेला वन बीएचके फ्लॅट हा बिल्डर श्री नारायण कासियानी यांचेकडे बुकींग केलेला होता, व त्यांचे सौदा झालेला होता, परंतु अद्याप पावेतो सदर प्लॅटचे खरेदी बाबतचे दस्त नोंदणी झालेले नव्हते. सदर बिल्डर दस्त नोंदणी करून सदरचा प्लॅट तक्रारदार यांना खरेदी करुन देण्यास तयार झाल्याने, तक्रारदार यांनी वरील नमूद खाजगी इसम संदीप कारवाळ यांना भेटले व त्यांना त्यांचे कामकाजाची 1750/- रुपये फी दिली व फ्लॅट नोंदणीचे सर्व कागदपत्रे दिली. परंतु वारस हक्काबाबतचे प्रतिज्ञापत्र ऐवजी कोर्टाकडून सक्सेशन सर्टिफिकेट लागेल तेव्हाच दस्त नोंदणी करुन खरेदी होईल जर सक्सेशन सर्टिफिकेट शिवाय दस्त नोंदणी करुन खरेदी करावयाचे असेल तर सब रजिस्टर ऑफिसर यांना 5000/- रुपये द्यावे लागतील असे सांगून पाच हजार रुपयाची पंच साक्षीदार यांचे समक्ष मागणी करुन, आज दि. २२/०३/२०२४ रोजी पंचा समक्ष घेताना रंगेहाथ पकडले आहे.यातील आरोपी यांचेवर उपनगर, पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- महिला, वय-४६
▶️ संदीप दिलीप कारवाळ, वय ३८, व्यवसाय-वकील, रा. महालक्ष्मी नगर, दशक जेल रोड, नाशिकरोड,
(खाजगी इसम)
लाचेची मागणी-५०००/-
*लाच स्विकारली- ५०००/-
*हस्तगत रक्कम-५०००/-
*लालेची मागणी – दि.२२/०३/२०२४
*लाच स्विकारली – दि.२२/०३/२०२४
तक्रारदार यांचे मयत पती यांनी तक्रारदार ह्या सध्या राहत असलेला वन बीएचके फ्लॅट हा बिल्डर श्री नारायण कासियानी यांचेकडे बुकींग केलेला होता, व त्यांचे सौदा झालेला होता, परंतु अद्याप पावेतो सदर प्लॅटचे खरेदी बाबतचे दस्त नोंदणी झालेले नव्हते. सदर बिल्डर दस्त नोंदणी करून सदरचा प्लॅट तक्रारदार यांना खरेदी करुन देण्यास तयार झाल्याने, तक्रारदार यांनी वरील नमूद खाजगी इसम संदीप कारवाड यांना भेटले व त्यांना त्यांचे कामकाजाची 1750/- रुपये फी दिली व फ्लॅट नोंदणीचे सर्व कागदपत्रे दिली परंतु वारस हक्काबाबतचे प्रतिज्ञापत्र ऐवजी कोर्टाकडून सक्सेशन सर्टिफिकेट लागेल तेव्हाच दस्त नोंदणी करुन खरेदी होईल जर सक्सेशन सर्टिफिकेट शिवाय दस्त नोंदणी करुन खरेदी करावयाचे असेल तर सब रजिस्टर ऑफिसर यांना 5000/- रुपये द्यावे लागतील असे सांगून पाच हजार रुपयाची पंच साक्षीदार यांचे समक्ष मागणी करुन, आज दि. २२/०३/२०२४ रोजी पंचा समक्ष घेताना रंगेहाथ पकडले आहे.यातील आरोपी यांचेवर उपनगर, पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा व तपास अधिकारी –
श्री.नितीन पाटील, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मोबा.नं.9284661658
▶️ *सापळा पथक*
पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गंगोडे,
मपोशी शितल सूर्यवंशी, पोलीस शिपाई संजय ठाकरे,