इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रशियात मॉस्को कॉन्सर्ट हॉलमध्ये १२ हल्लेखोरांनी स्वयंचलित शस्त्रांसह मैफिलीत लोकांवर गोळीबार केला. इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान ६० लोक ठार आणि १४५ हून अधिक जखमी झाले आहेत, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान शुक्रवारी रात्री ११.१५ वाजता हा हल्ला झाला.
मॉस्कोच्या क्रोकस सिटी हॉलमध्ये सुरू झालेल्या संगीत मैफलीला पाचशेहून अधिक लोक उपस्थित होते. लष्करी गणवेशातील सुमारे १२ हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. स्फोटानंतर हॉलमध्ये आग लागली. बरेच लोक आत अडकल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले. सरकारने हे रशियाविरुद्धचे युद्ध आहे, असे म्हटले असून या युद्धाला जबाबदार असणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, या हल्ल्याला युक्रेन जबाबदार नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. रशियातील अमेरिकन दूतावासाने २ आठवड्यांपूर्वी अशा हल्ल्याचा इशारा दिला होता.