मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर काँग्रेस नेते आमदार भाई जगताप यांनी थेट सोशल मीडियावरुन जोरदार टीका करत अण्णा जागा झाला.! असे म्हटले आहे. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर भाई जगताप यांनी हा जोरदार टीका केली आहे.
अण्णा जागा झाला.!
- मणिपूर च्या महिलांची नग्न धिंड काढली तेव्हा गप्प होता..
- हाथरस च्या वेळी तोंड शिवून बसला होता..
- दिल्ली बॉर्डर वर शेतकरी मरत होते तेव्हाही हा गप्पच होता..
- इलेक्टोरल बॉण्ड्स चा घोटाळा उघड झाला तरी हा मूग गिळून गप्प होता..
- महिला खेळाडूंवर अत्याचार झाले त्यावरही याने तोंड उघडले नाही..
आणि आज अरविंद केजरीवाल ला अटक होताच भाजपा सरकारचे अभिनंदन आणि केजरीवाल भ्रष्ट आहे सांगायला आला…
जरा तरी लाज वाटू दे रे दलाला!