इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी जाणार आहे. उपमुख्य़मंत्री अजित पवार यांनी शनिवारी मुंबईत १० वाजता देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावरचा दावा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा पवित्रा घेतल्याने आढळराव यांना आता कोणत्याही परिस्थितीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. काही दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटलांच्या उपस्थितील बैठकीला आढळराव उपस्थित होते. त्यावेळेसच हा निर्णय झाला होता.
आढळराव पाटील हे अजित पवार गटात गेल्यानंतर शिरुर लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाचे डॅा. अमोल कोल्हे यांच्यात त्यांचा थेट सामना होणार आहे.