नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नी व नातेवाईक यांचे नांव सातबा-यावर लावण्याकरीता मालेगाव कॅम्प येथील तलाठी कृष्णा मुंजाजी भिसे (४५) हे दोन हजार रुपये लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याबरोबर खासगी इसम समीर शेख यास लाच मागणीस व स्विकारण्याकरीता प्रोत्साहन दिले म्हणून कारवाई केली आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तलाठी कृष्णा मुंजाजी भिसे यांनी सोयगांव ता. मालेगांव जि. नाशिक येथील दोन प्लॉट या क्षेत्रावर फिर्यादी यांची पत्नी व नातेवाईक यांचे नांव लावण्याकरीता दिनांक 22/03/2024 रोजी तलाठी कार्यालय, सजा मालेगांव कॅम्प या कार्यालयातील त्यांचे कक्षेत प्रत्येकी एका प्लॉटचे पंधराशे पंधराशे रुपये असे एकुण 3000/- रुपये लाचेची मागणी करुन, तडजोड अंती एका प्लॉटचे 1000/- रुपये प्रमाणे एकुण 2000/- रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष करुन, दिनांक 22/03/2024 रोजी पंच साक्षीदारासमक्ष 2000/- रुपये लाचेची रक्कम स्विकारली आहे. मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेस आरोपी क्रमांक २ यांनी आलोसे क. १ यांचे लाच मागणीस व स्विकारण्याकरीता प्रोत्साहन दिले आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष
आलोसे– 1)कृष्णा मुंजाजी भिसे वय 45 वर्ष पद – तलाठी सजा मालेगांव कॅम्प ता. मालेगांव जि .नाशिक रा. मोरे पार्क, जुना दाभाडी रोड, फ्लॅट नं. 3, सोयगांव ता.मालेगाव जि. नाशिक
2) समीर शेख – खाजगी इसम
लाचेची मागणी रक्कम व दिनांक :- रुपये 3000 तडजोड अंती 2000 रुपये
दिनांक 22/03/2024
लाच स्वीकारली रक्कम व दिनांक– रुपये 2,000/-
दिनांक- 22/03/2024
लाचेचे कारण – यातील आलोसे लोकसेवक श्री. कृष्णा मुंजाजी भिसे यांनी सोयगांव ता. मालेगांव जि. नाशिक येथील दोन प्लॉट या क्षेत्रावर फिर्यादी यांची पत्नी व नातेवाईक यांचे नांव लावण्याकरीता दिनांक 22/03/2024 रोजी तलाठी कार्यालय, सजा मालेगांव कॅम्प या कार्यालयातील त्यांचे कक्षेत प्रत्येकी एका प्लॉटचे पंधराशे पंधराशे रुपये असे एकुण 3000/- रुपये लाचेची मागणी करुन, तडजोड अंती एका प्लॉटचे 1000/- रुपये प्रमाणे एकुण 2000/- रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष करुन, दिनांक 22/03/2024 रोजी पंच साक्षीदारासमक्ष 2000/- रुपये लाचेची रक्कम स्विकारली आहे. मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेस आरोपी क्रमांक २ यांनी आलोसे क. १ यांचे लाच मागणीस व स्विकारण्याकरीता प्रोत्साहन दिले आहे.
*आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी
मा .जिल्हाधिकारी नाशिक
सापळा अधिकारी
स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक–
पोहवा प्रभाकर गवळी
पोना किरण धुळे
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .