इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेबाबत इंडिया आघाडीकडे तक्रार केली. यावेळी सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थितीत होते. त्यांनी निवडणूक आयोगाशी सविस्तर चर्चा केली आहे.
काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक आयोगासमोर हा मुद्दा मांडला आहे की – हे कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाबद्दल नाही तर ते संविधानाच्या मूलभूत रचनेशी संबंधित आहे.जेव्हा तुम्ही एजन्सींचा गैरवापर करता ज्यांना निवडणुकांसाठी समान खेळाची आवश्यकता असते, तेव्हा त्याचा परिणाम मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांवर होतो आणि शेवटी लोकशाहीवर. आम्ही निवडणूक आयोगाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.
स्वतंत्र भारताच्या ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. तर सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात एजन्सीच्या गैरवापराचे पुरावे आम्ही दिले आहेत. या यंत्रणांची कारवाई सत्ताधाऱ्यांवर दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणूक आयोग जर डीजीपी, सचिव बदलू शकतो तर या एजन्सींवर नियंत्रण का ठेवत नाही, अशी मागणीही आम्ही केली आहे.