सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील डांगसौंदाणे उपबाजर समितीच्या आवारात नवरात्रीच्या शुभारंभी मुहूर्तावर भाजीपाला खरेदी सुरू करण्यात आली. पश्चिम भागातील बहुसंख्य शेतकरी तूर पीक घेऊन मार्केटला ओल्या तुरीच्या शेंगा मोठ्याप्रमाणत विक्रीसाठी बाहेरील मार्केटला पाठवत असल्याने शेतकरी वर्गाच्या सोयीसाठी बाजार समितीचे चेअरमन संजय सोनवणे यांनी या ठिकाणी हे मार्केट सुरू करण्याची विनंती व्यापारी वर्गाला केल्याने पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणांत आवक बाजार आवारात दिसून आली.
स्थानिक व बाहेरील व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात हा शेतमाल खरेदी केला या लिलावाचा शुभारंभ स्थानिक शेतकरी गोविंदा सुलक्षण यांनी केला.
या वेळी ओल्या तुरीच्या शेंगाना प्रतिकिलो १०५ सर्वाधिक दर मिळाला तर वाल पापडीला ५० रुपये प्रति किलो दर मिळाला या वेळी झेंडू फुले ही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणले होते.
शेतमाल खरेदीसाठी भाजीपाला व्यापारी माऊली ट्रेडिंगचे केदा बोरसे, यांनी १०५ हा सर्वाधीक दर देत तुरीचा माल खरेदी केला तर रोहित बोरसे, महेश देवरे, निलेश आहिरे, रोहिदास भामरे,पिंगळवाडे,प्रकाश भामरे दसवेल, प्रवीण पाटील कळवण या व्यापारींनी लिलावात सहभागी होत मोठ्या प्रमाणावर शेतमाल खरेदी केला यावेळी बाजर समिती चेअरमन संजय सोनवणे, सोपान सोनवणे, रवींद्र सोनवणे, भुषण भदाणे, बाळासाहेब सोनवणे, कडू सोनवणे, रवींद्र बोरसे, बापू सुलक्षण, गोपाळ ह्यालीज,कैलास सोनवणे सनी सोनवणे, भावसा खैरनार ,राहुल खैरनार आदीसह जोरण, तळवाडे, निकवेल, साकोडा, येथील शेतकरी उपस्थित होते
खूप दिवसांच्या प्रयत्नांतर यश
डांगसौंदाणे उपबाजार समिती निर्मितीसाठी खूप दिवसांच्या प्रयत्नांतर यश आले आहे. हे उपबाजार सर्व सोयीसुविधा युक्त कसे होईल यावर आता भर दिला जाणार आहे. भाजीपालासह टोमॅटो, मिरचीची ही पिके या भागात उत्तम दर्जाची पिकवली जातात या ठिकाणी भाजीपाला व्यापरीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणासाठी प्रयत्नशील राहू.
संजय सोनवणे
चेअरमन सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती