मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप व काँग्रेस हे राष्ट्रीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले असले तरी प्रादेशिक पक्षांची नावे अद्याप जाहीर झालेली नाही. पण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिले संभाव्य नऊ उमेदवार ठरवले असून त्यातील दोन-तीन नावे अपेक्षित असली, तरी अन्य नावे आश्चर्यकारक आहेत.
राज्यभरात चर्चेत असलेल्या माढा लोकसभेची जागा शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्यासाठी सोडणार असल्याचे चर्चा आहे. महाविकास आघाडीत बारामती, माढा, सातारा, शिररूर, नगर दक्षिण, बीड वर्धा व दिंडोरी या जागा पवार गटाच्या वाट्याला आल्या आहेत.
बारामतीत अपेक्षेप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे, माढ्यातून महादेव जानकर, साताऱ्यातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून नीलेश लंके, बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे तर वर्ध्यातून अमर काळे हे उमेदवार असू शकतात. दिंडोरीत भास्कर भगरे यांचे नाव चर्चेत असले तरी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही