नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वृध्देची १८ लाखाची आर्थिक फसवणुक करण्यात आल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्री केलेली सदनिका तारण ठेवून परस्पर कर्ज काढून ही फसवणूक कऱण्यात आली आहे.
श्रीपाद विनायक ठोंबरे,साकेत अविनाश गोसावी व दिपाली श्रीपाद ठोंबरे अशी वृध्देची फसवणूक करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत शालिनी शामराव पाटील (रा.वेद रेसि.रथचक्र चौका मागे) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांनी सन.२००९ मध्ये संशयितांकडून वेद रेसिडन्सी या सोसायटीतील सदनिकेचा व्यवहार केला होता.
यापोटी अठरा लाख ११ हजार रूपये अदा करण्यात आलेले असतांना संशयितांनी युनियन बँककडे फ्लॅट तारण ठेवून ११ लाख ४० हजार रूपयांचे परस्पर कर्ज काढल्याचे समोर आले आहे. ही बाब निदर्शनास येताच पाटील यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.