नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील त्रिमुर्तीचौक भागात घरात घुसून शेजा-याने एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैतन्य हर्षल कुलकर्णी (रा.वात्सल्य अपा. राधासोना नगर) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
महिला घरात एकटी असतांना संशयिताने वायफाय वापरण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.