मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धुळे-मालेगाव लोकसभेचे भाजपा उमेदवार खासदार सुभाष भामरे यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे.मात्र त्यांच्या उमेदवारीला मालेगाव मधूनच विरोध होत असून अज्ञात व्यक्तीनी आपली नाराजी व्यक्त करत त्यांच्या विरोधात बँनर लावले आहे.
या बँनरमधून असा खासदार मान्य आहे का असा सवाल बँनरच्या माध्यमातून विचारला आहे. विद्यमान खासदारांचे धुळे-मालेगाव लोकसभा मतदार संघात हिंदुत्वासाठी योगदान काय ? मागील दहा वर्षा पासून विद्यमान खासदार हरवले आहे. शारिरीक क्षमता नसलेला खासदार आम्हाला नको…असे प्रश्न करत अशा आशयाचे हे बँनर लागल्याने मालेगाव मध्ये चर्चेला उधाण आले आहे.