नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ग्रामीण भागात सेवा देत असतांना अधिकारी, कर्मचारी हे उत्कृष्ठ काम करत असतात अशा उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्या कामाची माहिती इतरांपर्यंत पोहचावी या उद्देशाने कॉफी विथ सीईओ उपक्रमाच्या आजच्या भेटीत शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमात शिक्षण विभागातील उपस्थित मुख्याध्यापक निवृत्ती तळपडे, विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक, शिक्षिका ज्योती कदम, शिक्षक किरण कापसे तर महिला व बालविकास विभागातील अंगणवाडी सेविका अनीता जाधव, पर्यवेक्षिका वंदना शिंपी, अंगणवाडी सेविका शैला सोनवणे, अंगणवाडी मदतनीस स्वप्नीता देशमुख यांनी ग्रामीण भागात काम करत असतांना येणाऱ्या अनुभवांचे कथन करत अडचणींवर मात करून केलेल्या उत्कृष्ठ कामांविषयी माहिती दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची माहिती घेत त्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल यासाठी विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना केल्या व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, दिंडोरीचे महिला व बालविकास अधिकारी विलास कव्हले हे उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा जऊळके दिंडोरी येथील मुख्याध्यापक व शिक्षक हे उपस्थित होते.
कर्मचारी व त्यांची उल्लेखनीय कामगिरी –
शिक्षण प्राथमिक विभाग
1) भाऊसाहेब सरक (विस्तार अधिकारी (शिक्षण) तालुका सुरगाणा- मिशन नवोदय सुरगाणा – सुरगाणासारखे अतिदुर्ग भागात आर्थिक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या सर्व हुशार होतकरू मुलांना सीबीएससी बोर्डाचे उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मोफत मिळावी यासाठी मिशन नवोदय सुरू केले
2 ) निवृत्ती तळपडे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली खैरे तालुका इगतपुरी – शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन
3 ) ज्योती कदम ( शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवडी तालुका सिन्नर ) – मॉडेल स्कूल जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची शाळा
4 ) किरण कापसे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जऊळके दिंडोरी – शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन
म.बा.वि विभाग ( पूर्व प्राथमिक शिक्षण )
पालवी व लर्निंग रॉकेट प्रकल्पच्या माध्यमातून विशेष कामगिरी
5) अनिता जाधव अंगणवाडी सेविका उमराळे तालुका दिंडोरी – अनिता जाधव यांनी पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी पालकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी सर्व पालकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले व त्यांना दररोज नवनवीन ऍक्टिव्हिटीज व्हाट्सअप वरती पाठवल्या सुरुवातीला प्रतिसाद कमी होता परंतु सर्वांचे समुपदेशन व मार्गदर्शन पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
6) वंदना शिंपी पर्यवेक्षिका येवला – कोरोना काळ त्यामुळे 1 वर्ष बालक अंगणवाडीत येत नव्हते , त्या दरम्यान अंगनवाडी ताई ,मदतनीस यांना टाकाऊतून टिकाऊ असे वेगवेगळे पपेट प्रशिक्षणातून शिकवले
7) स्वप्निता देशमुख अंगणवाडी मदतनीस दुर्गा नगर मोहाडी तालुका दिंडोरी – स्वतः शैक्षणिक साहीत्य तयार करणे, मदतनीस कामकाज करून एक तास शिकवतात, तसेच प्रत्येक अॅक्टीव्हीटीत सर्व बालकांना सहभागी करून घेतात .
8) शैला सोनवणे अंगणवाडी सेविका दत्तवाडी तालुका सिन्नर – पालवी प्रकल्पामधून प्रशिक्षण घेऊन विशेष उल्लेखनीय कामगिरी