नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाने (नागरी रिट याचिका क्र. 880, वर्ष 2017) प्रकरणी 15 फेब्रुवारी, 11 मार्च आणि 18 मार्च 2024 रोजी दिलेल्या आदेशांचे पालन करत भारतीय स्टेट बँक-एसबीआयने निवडणूक रोख्यांशी संबंधित माहिती आज दिनांक 21 मार्च 2024 रोजी भारतीय निवडणूक आयोगाला उपलब्ध करून दिली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांसंदर्भातील ही माहिती ‘एसबीआय’कडून ‘जशी व जिथे प्राप्त झाली तशी’ आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. ‘एसबीआय’ने दिलेल्या माहितीची निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील लिंक
https://www.eci.gov.in/candidate-politicalparty