इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्या अटकेवर प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घाबरलेल्या हुकूमशहाला मृत लोकशाही निर्माण करायची आहे असे सांगत सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांसह सर्व संस्था काबीज करणे, पक्ष फोडणे, कंपन्यांकडून पैसे उकळणे, प्रमुख विरोधी पक्षाचे खाते गोठवणे या ‘शैतानी शक्ती’साठी पुरेसे नव्हते, तर आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेचे प्रकारही सर्रास झाले आहेत. या प्रकाराला इंडिया आघाडी चोख प्रत्त्युत्तर देईल.
तर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपा सरकार हटाओ, देश बचाओ असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या अटकेवर तीव्र नाराजी व्यक्त करुन तपास यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचे म्हटले आहे.