नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ५७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगालच्या बेरहामपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. तर या यादीत महाराष्ट्रातील ७, गुजरातमधील ११, कर्नाटकमधील १७, राजस्थानमधील ६, तेलंगणामधील ५, पश्चिम बंगालमधील ८, आंध्र प्रदेशमधील २ तर पॅडेचेरीमधील एका उमेदवारांचा समावेश आहे.
हे आहे महाराष्ट्रातील उमेदवार
कोल्हापूर – छत्रपती शाहु महाराज
अमरावती – बळवंत वानखेडे
नांदेड – वसंतराव चव्हाण
पुणे – रविंद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाल पाडवी
लातूर – डॅा. शिवाजीरावर काळगे
सोलापूर – प्रणिती शिंदे