इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाविकास आघाडीकडून अद्याप जागा वाटपावर चर्चा सुरु असतांना दुसरीकडे सांगतील उध्दव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदार संघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदार संघात काँग्रेसचा दावा होता. काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही जागा काँग्रेसचीच असेल असे सांगितले होते. पण, त्यानंतरही ही घोषणा झाल्यामुळे आता काँग्रेस काय प्रतिक्रिया देते हे महत्त्वाचे ठरणार आहे.
या सभेत उध्दव ठाकरे म्हणाले की, तुमचं मत हे महाराष्ट्राच्या बाजूने असलं पाहिजे, महाराष्ट्राच्या लुटारुंच्या बाजूने नाही! चंद्रहारची अस्सल गदा माझी जनता आहे. जोपर्यंत ही गदा सोबत आहे, तोपर्यंत प्रतिस्पर्ध्यांची चिंता नाही. मतभिन्नता तेव्हाही होती.
यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेने, शिवसेनाप्रमुखांनी कधी सुडाचं राजकारण कधीच केलं नाही. मिंध्याना सांगतो, सगळ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलायत तर चाळीस पोपट घ्या आणि कुठल्यातरी झाडाखाली बसून ज्योतिषाचं काम सुरु करा. जो माणूस मातीमध्ये कुस्ती खेळतो आणि जिंकतो, तो मातीशी इमानच राखेल. मातीशी बेईमानी म्हणजे मातेशी बेईमानी आहे.