मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाई, सातारा येथे अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती की, कंटेनरने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे आठवले यांची कार कंटेनरला धडकली. या अपघातानंतर रामदास आठवले हे दुस-या कारने मुंबईकडे रवाना झाले.