मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एकदा जाहीर झालेली उमेदवारी सहसा बदलली जात नाही. पण, ही नामुष्की भाजपवर अंतर्गत विरोधामुळे आली असल्याचे वृत्त आहे. स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे माढा मध्ये उमेदवारी बदलण्यावर एकमत झाले आहे. या ठिकाणी भाजपने खा. रणजितसिंह निंबाळकर यांना तिकीट दिले होते. पण, त्यांना प्रचंड विरोध झाल्यामुळे ही जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे माढामध्ये शरद पवार गट विरुध्द अजित पवार गट असा सामना रंगणार आहे.
भाजपला या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने साता-याची जागा सोडली असून येथे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.
रणजिंतसिहं नाईक – निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माढामध्ये विजयसिंह मोहिते – पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते- पाटील यांचे समर्थक संतापले होते. कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याचा निर्णय़ घेतला होता. मंत्री गिरीश महाजन यांनाही घेराव घालण्यात आला होता. त्यामुळे महायुतीने जागा अदला बदल करुन येथील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला आहे.