नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाने व्हॉट्सॲपवर पाठवले जाणारे विकास भारत संदेश केंद्र सरकारला त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले. सरकारच्या योजनांची माहिती देणारे संदेश सर्वसामान्यांना पाठवले जात असल्याची तक्रार आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानंतर आयोगाने हे निर्देश दिले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही हे संदेश पाठवलो जात होते. पण, केंद्रीय मंत्रालयाने आयोगाला दिलेल्या उत्तरात हे संदेश आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाठविण्यात आले होते असे सांगितले. सिस्टम आणि नेटवर्क समस्यांमुळे ते उशिरा पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान निवडणूक आयोगाने गुजरात, पंजाब, ओडिशा आणि आसाम या चार राज्यांतील आठ जिल्हाधिकारी आणि आठ पोलिस प्रमुखांच्या बदल्या करण्याचा आदेश दिला होता.