नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागात बेकायदा मद्यविक्री करणा-या तीघांवर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पंचवटी, उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पेठरोडवरील लक्ष्मणनगर भागात पंचवटी पोलीसांनी सचिन सुधाकर आव्हाड (रा.विजय चौक,श्रीरामनगर फुलेनगर ) या मद्यविक्रेत्याच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी (दि.२०) सायंकाळी तो लक्ष्मण नगर भागातील मोकळया पटांगणात उघड्यावर दारू विक्री करीत होता. त्याच्या ताब्यातून सुमारे तीन हजार २० रूपये किमतीचा प्रिन्स संत्रा नावाचा देशीदारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी शिपाई गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.
दुसरी कारवाई नाशिकरोड येथील खोले मळा भागात करण्यात आली. सुवर्णा सोसायटी भागात नरेंद्र सोनू खोटे (रा. कदम लॉन्स जवळ थोरातनगर,) हा मंगळवारी (दि.१९) रात्री बेकायदा दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून ९८० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक होलगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.
तिसरी कारवाई शिंदे पळसे येथे करण्यात आली. बापू सुधाकार भालेराव (रा.पळसे) हा बुधवारी (दि.२०) सायंकाळी दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून ३ हजार १० रूपये किमतीच देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी शिपाई भाऊसाहेब नागरे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.