येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे अशा उन्हाळ्याच्या दिवसात मात्र अनेक झाडे हे फुलांनी बहरलेले दिसतात .नाशिकच्या येवला-कोपरगाव रस्त्यावर अशीच काही विदेशी फुलांची झाडे बहरलेली पहावयास मिळत आहे. जी केवळ शोभेची झाड म्हणून ओळखली जातात.
पिंक ट्रम्पेट ट्री असे इंग्रजी नाव असलेल्या या झाडांना आकर्षक फिक्कट गुलाबी पांढ-या रंगाच्या फुलांनी हे झाड रस्त्याच्या कडेला बहरलेली असलेल्याने या रस्त्याने जातांना डोळ्यांना सुखद अनुभव मिळतो. ज्या प्रमाणे पळस हा उन्हाळ्यातच फुलत असतो. त्याचप्रमाणे या झाडांवर फुलणारी फुले हे केवळ उन्हाळ्याच्या दिवसातच फुलत असतात. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात रस्त्याने जातांना काहीसा सुखद अनुभव ही झाडे देऊन जातात…
……..