नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश तसेच सुंदर नाशिक हरित नाशिकचा संदेश प्रसारित करण्यासाठी, दरवर्षीप्रमाणे यंदाही जीतो द्वारे अहिंसा रने ३१ मार्च रोजी होणार आहे. गेल्या वर्षी या रनला सुरवात झाली होती. त्यावेळी ५ हजार स्पर्धक धावले होते. मागील वर्षी ३ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली असुन यंदा या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. १४ वर्षांवरील सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे. ( जीतो चे ६८ चैप्टर आणि २२ आंतरराष्ट्रीय चैप्टर) यांनी आपापल्या शहरातून रविवार, ३१ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता, ३ किमी, ५ किमी आणि १० किमी अहिंसा रन आयोजित करण्यात आल्याची माहिती जीतो नाशिकचे चेयरपर्सन अँड. सुबोध शहा, सौ. कल्पना पटणी, हर्षित पहाडे यांनी दिली.
सदरच्या अहिंसा रनचे नशिकचे स्थानिक मुख्य प्रायोजक ललित रुंग्टा ग्रुप व् सहप्रायोजक ऋषभ इन्स्ट्रुमेंटस लिमिटेड आहेत. सदरची अहिंसा रन गोल्फ क्लब येथून सुरु होऊन ३ किमी. सिबल होटल, ५ कि.मी. एबीबी सर्कल, १० कि.मी. सातपुर अशा तिनही स्पर्धा रिटर्न गोल्फ क्लब येथे होणार आहे. स्वच्छ नाशिक, हरित नाशिकसाठी सर्व नाशिककरांनी अहिंसा रनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जीतो नाशिकच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ही ’अहिंसा रन’ केवळ एक समुदायापुरती मर्यादित नसून जगभरातून अहिंसेच्या बाजूने असलेल्या लोकांना यात आमंत्रित करण्यात आले आहे. सर्व स्पर्धकांसाठी टी-शर्ट, मेडल आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासंबंधीची अधिक माहिती सोशल मीडिया वेबसाइट ahimsarun.com आणि जीतो चॅप्टर, बिज़नेस बे, तिड़के कॉलनी येथे नोंदणीकरता येईल. असे आवाहन संदिप पहाडे, वैशाली जैन, मीता मुथा, मनीषा चोपडा यांनी केले आहे.