मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात डासांचा उपद्रव वाढल्याने मालेगाव नागरी सुविधा समितीने काही दिवसांपूर्वी डासाची प्रतिकृती सह महापालिकेवर मोर्चा काढला होता. महापालिका आयुक्त रविंद्र जाधव यांनी या मोर्चाची दखल घेतल्या नंतर मलेरीया विभागातर्फे शहरातील विविध भागात डास प्रतिबंधक फवारणीला सुरुवात केली.
महापालिका आयुक्त रविंद्र जाधव,आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थित या डास प्रतिबंधक फवारणीची सुरुवात करण्यात आली. यावेळी मालेगाव नागरी सुविधा समिती तर्फे आयुक्तांचा सत्कार करण्यात आला.