नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार्वाक चौक भागात बांधकाम साईटवर स्लॅब टाकण्याचे काम करीत असतांना इलेक्ट्रीक शॉक लागल्याने २१ वर्षीय मजूराचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविंद्र जत्र्या पाडवी (रा.विजयनगर,मोरवाडी सिडको) असे मृत मजूराचे नाव आहे. पाडवी बुधवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास चार्वाक चौकातील पाटील गार्डन भागात बांधकाम व्यावसायीक नितीन लढानी याच्या सुरू असलेल्या साईटवर कामाला गेला होता. आठव्या मजल्यावर स्लॅप ओतण्याचे काम सुरू असतांना अचानक त्यास इलेक्ट्रीक शॉक लागला.
या घटनेत गंभीर जखमी झाल्याने ठेकेदार संतोष अंबटकर यांनी त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.