नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियाचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढत असतांना नाशिकमध्ये एक घटना समोर आली आहे. एकाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून तरूणीची बदनामी केल्याचा प्रकारा उघडकीस आला आहे. मुलीच्या पालकांनाच बदनामीकारक संदेश पाठविण्यात आल्याने याची गंभीर दखल पालकांनी घेतली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्दारका भागात राहणा-या एका पित्याने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदर इसमाच्या मुलीच्या नावे अज्ञात भामट्यांनी बनावट फेसबुक अकाऊंट बनवून हा उद्योग केला. आई वडिलांना बदनामीकारक संदेश प्राप्त झाल्याने हा प्रकार समोर आला असून मुलीच्या नावाने अकाऊंट तयार करणा-या व तिच्याबाबत बदनामीकारक संदेश पाठविणा-या भामट्यांविरोदात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.