नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – काँग्रसची एक महिन्यापूर्वी खाती गोठवल्यानंतरही देशातील न्यायालय, निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही. सर्वजण शांतपणे तमाशा पाहत आहेत. आम्ही २० टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करत आहोत. आज आम्ही रेल्वे तिकीट विकत घेऊ शकत नाही, आमच्या नेत्यांना प्रचारासाठी एका शहरातून दुस-या शहरात पाठवू शकत नाही, आम्ही जाहिरात करु शकत नाही, आज आमच्याकडे दोन रुपयेही नाहीत अशा शब्दात राहूल गांधी यांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
राहुल गांधी पुढे म्हणाले, सात वर्षापूर्वी १४ लाखांचा कर भरण्यात काही कसूर झाली, त्याबद्दल २०० कोटी रुपये असेलली आमची बँक खाती गोठवण्यात आली आहे. प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदीनुसार अशाप्रकारे कर भरण्यास उशीर झाला तर जास्तीत जास्त १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. मात्र तरी बळजबरीने, गुन्हेगारी पध्दतीने आमच्या विरोधात कारवाई केली जात आहे. भारताचे पंतप्रधान आमचे संवैधिनिक अधिकार गुन्हेगारी पध्दतीने हिरावून घेत आहेत.