अरविंद निकुंभ, इंडिया दर्पण वृत्तसेवा
इलॉन मस्कच्या न्यूरालिंक कंपनीने एक मोठा पराक्रम केला. न्यूरालिंकने नोलँड अर्बॉफ नावाच्या २९ वर्षाच्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये ऑपरेशन व्दारे एक चिप प्रत्यारोपित केली. आता ही व्यक्ती मनाने विचार करूनच संगणकाचा कर्सर हलवू शकतो. तो पॉज देऊन आणि बुद्धिबळ खेळू शकतो. इतकेच नाही तर हवे तो व्हिडिओ बघू शकतो.
याचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात हा व्यक्ती संगणकावर बुद्धिबळ खेळत आहे आणि आवश्यकतेनुसार गाणे वाजवतो आणि थांबवतो. खरं तर ऑपरेशननंतर ती व्यक्ति निरोगी आहे. या व्यक्तीचे शरीर क्वाड्रिप्लेजिक नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. माने खालचा भाग अर्धांगवायूग्रस्त आहे. आणि त्यामुळे त्याच्या मानेखालच्या शरीराची संवेदना गेली आहे. त्यामुळे ही व्यक्ती व्हीलचेअरवर राहते. ही व्यक्ती हे सर्व काम तो फक्त त्याच्या मनात विचार करूनच करतोय. त्याने कशालाही हात लावला नाही ही गोष्ट जगातील सुपरपॅावर ठरली आहे. तर बघा हा व्हिडिओ…